कुर्डुवाडी येथून लखनौसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली
जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना गावी सोडण्यासाठी आज कुर्डुवाडी येथून लखनौसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. दुपारी अडीच वाजता 1236 प्रवाशांना घेऊन निघालेली ही रेल्वे उद्या रात्री पर्यंत लखनौ येथे पोहोचेल. समन्वय अधिकरी,उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसिलदार डी.एस. कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments