संभाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचा उपक्रम
सोलापुर—* छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाॅ,पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे प्रदेशअध्यक्ष लक्ष्मण नेव्हल व प्रदेशसचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
ही चित्रकला स्पर्धा आॅनलाईन होणार आहे.पहिली ते तिसरी—पहिला गट,चौथी ते सहावी—दुसरा गट,सातवी ते नववी —गट तिसरा अशा तीन गटात स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेतील जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी आकारण्यात येणार नाही.जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक—५०१ रु.रोख व प्रमाणपत्र,द्वीतीय क्रमांक —३०१ व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक—२०१ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.राज्यस्तरीय प्रथम क्रमांक—१००१ ₹,द्वितीय क्रमांक—७५१ ₹,तृतीय क्रमांक—५५१₹ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. २० मे पर्यंत आॅनलाईन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेसाठी आंतरराष्टीृय चित्रकार नितीन खिलारे हे परिक्षक म्हणुन काम पाहतील.या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे,शहाजी रंदवे,राजकिरण चव्हाण,संतोष भद्रशेट्टी,प्रकाश बाळगे,विशाल पवार,अजित कणसे,नितीन भांगे,सिद्भेश्वर पवार,धन्यकुमार स्वामी,हणमंत भोसले,,अनिल गायकवाड,दिपक डांगे यांनी केले आहे.
0 Comments