कोरोनाची जनजागृती व तपासणीसाठी मोहोळच्या सामाजिक संस्थंने नगरपरिषदेस दिले साहित्य
मोहोळ (प्रतिनिधी):— कोरोना सारख्या जागतिक महामारीचा संसर्ग संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जवळपास मागील दोन महिन्यापासून संपूर्ण भारत देशासह सोलापूर जिल्ह्यातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र देशासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे याच्या प्रादूर्भाव मोहोळ शहरात होवू नये या पार्श्वभूमीवर चंद्रमौळी आद्योगिक वसाहत , स्वातंत्र्य सेनानी संदीपानदादा गायकवाड बहुउद्देशीय संस्था व श्री. राजन पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ नगर परिषदेस कोरोना बाबतच्या जनजागृतीसाठी व नागरिकांच्या तपासणीसाठी प्रात्यक्षिक दाखवून साहित्य देण्यात आले.
कोव्हीड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या शहरात होवू नये. इतर शहरात मोठ्या प्रमाणात होणारा संसर्ग थांबविण्यासाठी तेथील नागरिक व अधिकारी हे एकत्रितपणे येवून उपाययोजना करतात त्या उपाययोजनांची जनजागृती आपल्या शहरातील नागरिकांमध्ये होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी होणे ही आवश्यक आहे या सामाजिक भावनेतून डॉ . कौशिक गायकवाड यांच्या संकल्पनेतून चंद्रमौळी औद्योगिक वसाहत, स्वातंत्र्यसेनानी संदीपानदादा गायकवाड बहुऊद्देशिय संस्था व श्री राजन पाटील मित्र मंडळ मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ पी.पी ई कीट, थर्मल स्कँनिंग मशीन ३, आँक्सीमिटर ३, सँनिटायजर, हँन्डग्लोज, मास्क, हेडशिल्ड आदी साहीत्य नगरपरिषदेस देण्यात आले.
या प्रसंगी डॉ. कौशिक गायकवाड, ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. गायकवाड, डाँ.चेतन आयवळे, सलिम हरणमारे, यांनी मार्गदर्शन केले. हि तपासणी संपूर्ण शहरात केली जाणार असून त्यामध्ये घ्रानेद्रिय क्षमता, रक्तातील आँक्सिजनचे प्रमाण, नाडीचा ठोके, तपमान इत्यादी नोंदी घेतल्या जाणार आहेत. या तपासणी वेळी कोणत्याही आजाराचा एखाद्या व्यक्ती आढळल्यास व आवश्यक असल्यास त्या व्यक्तीस औषधोपचार केला जाणार आहे. एक महिन्याच्या नंतर पुन्हा हि तपासणी केली जाणार आहे अशी माहिती प्रतिक गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी संतोष सुरवसे, आण्णा फडतरे, मुस्ताक शेख, ऊद्योगपती राजू खपाले, भाऊसाहेब गायकवाड, राकेश देशमाने, सुवर्णा हाके, दिलीप खोडके, महेश माने, राजकुमार सपाटे, योगेश खराडकर, अरुण मांडवे आदी मान्यवर उपस्थित होते सौ हाके यांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी सुग्रिव व्यवहारे ,गोरख पवार, शिवाजी चव्हाण, अनिल नाईक, महेश पवार, सुरेश घाटगे, सज्जन पाटील, प्रसाद गुरव, दिलीप देशपांडे यांनी सहकार्य केले व करणार आहेत.
0 Comments