Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महत्वकांक्षी 10 हजार जिवनआवश्यक किट वाटपाच्या संकल्पपूर्तीचा 7 हजार 700 किट वाटुन चौथा टप्पा पुर्ण

सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महत्वकांक्षी 10 हजार जिवनआवश्यक किट वाटपाच्या संकल्पपूर्तीचा 7 हजार 700 किट वाटुन चौथा टप्पा पुर्ण


सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी गटात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून गोरगरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे 1700 किट वाटप

माणसातला पांडुरंग म्हणुन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील हे आले मदतीला धावून : गोर गरीब जनतेतून प्रतिक्रिया


सांगोला / प्रतिनिधी :कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य व गोरगरीब गरजू कुटुंबाची उपासमार होणार नाही या दृष्टीने आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून 10 हजार किट वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. पैकी 7 हजार 700 किट वाटप करून चौथा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोना संकटाचा सामना करताना, परिस्थितीशी झगडणाऱ्या गोर गरीब व गरजू अशा 10 हजार कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटपाचा संकल्प केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सांगोला तालुक्यातील गावांमध्ये आणी आता सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 15 गावांमध्ये गोरगरीब व गरजू कुटुंबांना 1 हजार 700 जीवनावश्यक किट वाटप करून संकल्पपूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार आणि दानशूर मंडळीकडून मागील काही दिवसांपूर्वी पासून मदत बंद झाली आहे. आणी लॉक डाऊनमध्ये मुदत वाढ झाली असताना, कुटुंबाचा गाडा कशावर चालवायचा, उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न समोर असताना पंढरीच्या पांडुरंग रुपी माणसातला पांडुरंग म्हणुन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील हे आले मदतीला धावून अशीच काहीशी प्रतिक्रिया गोरगरीब जनतेतून व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाऊनमुळे घरामध्ये अडकून राहिलेल्या गोरगरीब व गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून 10 हजार कुटुंबांना जीवनावश्यक कीट वाटपाचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यात कीट वाटप करण्यात येत आहेत. यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 15 गावातील गोरगरिब कुटुंबांना संकटकालीन परिस्थितीत जिवनआवश्यक कीटचे वाटप करीत, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात येणार्‍या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, खेडभाळवणी, उपरी, शेळवे, भंडीशेगाव, गार्डी, शेंडगेवाडी, पळशी येथील गोरगरीब मजूर वंचित लोकांना लॉकडाऊनच्या काळात रोजगार संपुष्टात आला असल्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न समोर असताना, शनिवार दि. २ रोजी तब्बल 14 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे वाटप करून अडचणीच्या काळात मोठी मदत केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडाऊन व संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय - व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आले आहे. या काळात अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. राजकारण समाजकारण करत असताना पक्षपार्टी बाजूला ठेवून अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आजपर्यंतच्या काळात बजावली आहे. ज्या ज्या वेळेस शेतकरी व सामान्य माणूस अडचणीत आला त्यावेळी देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मदतीची भूमिका बजावली आहे. यामध्ये गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी यासह अस्मानी संकटामुळे होणारे नुकसान त्याचबरोबर अचानक घडलेल्या प्रसंग यामधून बळीराजाला आणि सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पुढाकार घेऊन निश्‍चितपणे मदतीचा हात पुढे करीत, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज कोरोना या भयान संकटाचा सामना करताना गोरगरीब गरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या काळात शासनाने संचारबंदी व लॉक डाऊन चे आदेश जारी केल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. मोलमजुरी व उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. दुष्काळ त्यानंतर गारपीट आणि आता कोरोना यामध्ये अनेक कुटुंबांचे हाल सुरु आहेत. आशा परिस्थीतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मदतीची भूमिका घेण्यात आली आहे.
सदर किट वाटप प्रसंगी उपरी येथील तहसीलदार वाघमारे मॅडम, पंढरपूर पोलिस स्टेशनचे दिवसे साहेब, कांग्रेस पार्टी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष मारुतीराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस सांगोला तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष दिपकराव पवार, युवक अध्यक्ष अरुण असबे, खिलारवाडी गावचे नेते दिलीप भाऊ बागल, उद्योगपती व राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते अशोक माने, युवक नेते साहिल इनामदार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर.डी. पवार , दिगंबर सुडके, दिलीप बागल, पळशी गावचे मा. सरपंच गोपाळ, मा.सरपंच बाळासाहेब शेवाळे, मा. सरपंच अर्जुन जाधव, नंदकुमारजी बागल, पोलिस पाटील अशोक लोखंडे, युवक नेते योगेश जाधव, रोहिदास वाघमारे, शांताराम लोखंडे, लक्ष्मण जाधव, दत्ता गुरव, सत्यवान इंगोले, अर्जुन इंगोले, मनोज धुमाळ, अनिल सुतार, अशोक भोसले यांच्यासह सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी सर्कलमधील 15 गावातील सर्व पक्ष प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच सहकार शिरोमानि कारखान्याचे संचालक विलासराव जगदाळे, सरपंच शहाजी नागणे, शेंडगेवाडी अरुण पांढरे, केस्करवाडी धुळदेव केसकर अभिमान केसकर, शेळवे उमेश भोसले महादेव गाजरे, ब भांडीशेगाव समाधान सुरवसे पैलवान विजय भगत गणेश माने, सुपली वसंत यलमार बाळासो पाटील, भाळवणी भगवान चौगुले, शिवसेना नेते संभाजी शिंदे, बापू देशपांडे,, गार्डी जयदीप इनामदार विजय फाटे सोमा अनपट, लोणारवाडी किसन शिंदे निलेश गंगांमले, तिसंगी डॉक्टर सुधाकर महानवर, बाजी शेळके, हुपरी भारत नागणे , साहेबराव जगदाळे विजय नागणे, सोनके भारत कोळकर वसंत चंदनशिवे गोपने सर दगडू हाके, भारत नागणे, साहेबराव जगदाळे, पत्रकार सुधाकर जाधव, प्रवीण नागणे, नवनाथ पोरे उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments