फौजदार दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१)(३) प्रमाणे मनाई आदेश
जा.क्र.विशा/कोरोना/मनाई आदेश/१०८२/२०२० सोलापूर शहर दिनांक ३१/०३/२०२०
ज्या अर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा
संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र सरकार
आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केलेप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात लोकांनी येऊ नये तसेच
सार्वजनिक किंवा खाजगी जागेत ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे,
काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास याविषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता
सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक होत असल्याची माझी खात्री झाली आहे.
त्याकरीता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३
चे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक २३/०३/२०२० रोजीचे पहाटे ०५.०० वा. पासून ते दिनांक
३१/०३/२०२० रोजीचे २४.०० वा. पर्यंत लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशात सुधारणा करणे
आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी मी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त्त, सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी
दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक ०१/०४/१९७४ चे अधिसुचनेव्दारे प्राधिकृत अधिकारी म्हणून
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४
(१) (३) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन कोरोना विषाणूच्या प्रसाराची
वाढणारी तीव्रता पाहता तसेच दैनंदिन जन-जीवनातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची गरज
लक्षात घेता परिच्छेद क्र. ५ मधील नमुद सुचनांचे अधिन राहून दिनांक ०१/०४/२०२० रोजीचे रात्री
००.०१ वा. पासून ते दिनांक १४/०४/२०२० रोजीचे २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे मनाई आदेश पारित
करण्यात येत आहे.
१)
सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा
अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण,
उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५
पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग,
बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत सहली इ. यांचे आयोजन करणेस मनाई
राहील.
३)
सर्व सांप्रदायांची सर्व प्रार्थना व धार्मिक स्थळे लोकांसाठी बंद राहतील. तथापि सर्व सार्वजनिक
प्रार्थनास्थळे, मशिदी, चर्च, मंदिरे येथे होणा-या पुजा-अर्चा, दिवाबत्ती व नित्योपचार सुरुच
राहतील. हे धार्मिक विधी मंदिर मशिद/चर्च मधील आर्चक इमाम/पादरी यांचेसह पार पाडावे व
इतर भाविकांना या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. कोणासही स्वतःचे घरी कुटुंबियांशिवाय
इतर बाहेरील व्यक्तीस घेवून धार्मिक विधी करता येणार नाही.
केद्र सरकारचे अधिपत्याखालील खालील नमुद केलेली कार्यालये वगळून सर्व कार्यालये बंद
राहतील.
संरक्षण, केंद्रीय पोलीस दल, ट्रेझरी, सार्वजनिक उपक्रम (पेट्रोलियम, सीएनजी इ.) आपत्ती
व्यवस्थापन, उर्जा निर्मिती व वहन निर्माण करणारे विभाग, पोस्ट ऑफिसेस, राष्ट्रीय सुचना
केंद्र, अत्यावश्यक सेवा देणारे उपक्रम कमीतकमी मनुष्यबळाचे सहाय्याने कार्यरत राहतील.
महाराष्ट्र शासनाचे अधिपत्याखालील खालील नमुद केलेली कार्यालये वगळून सर्व कार्यालये बंद
राहतील.
• पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती
व्यवस्थापन आणि तुरुंग सेवा.
• वनविभागाकडील सर्व प्राणि संग्रहालये, नर्सरी, वन्यजीव, जंगलातील आग विझवणारी
यंत्रणा, वृक्षारोपण जोपासना, गस्ती पथक.
समाज कल्याण विभागाकडील बालगृहे, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, निराधार स्त्रिया,
विधवा इ.ची निरीक्षणगृहे
• महानगरपालिका फक्त अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारे कर्मचारी
• सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन व नागरी पुरवठा तसेच अन्न आणि औषध प्रशासन
सर्व कार्यालयांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. जसे
प्रत्येक व्यक्ती तीन फुटावर उभे राहण्यासाठी खुणा कराव्यात.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात असणा-या दुकाने, सेवा आस्थापना,
उपहारगृहे साधगृहे खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे,
क्लब पव, क्रिडांगणे, मैदाने, ऑनलाईन लॉटरी, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे,
नाटयगृहे, शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग), प्रशिक्षण केंद्र,
संशोधन केंद्र, व्यायाम शाळा, संग्रहालये इ. बंद राहतील.
६)
तथापि खालील आस्थापना यांना बंद मधून सुट देण्यात येते.
रास्त भाव धान्य दुकाने, किराणा माल, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, पशुखाद्य, बेकरी
(केक शॉप वगळून), दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री व वितरण करणारी यंत्रणा व याबाबींकरीता
कच्चा माल पुरवठा करणारी यंत्रणा, संबंधित गोदामे व वाहतुक करणारे घटक हे नियमितपणे
सुरु राहतील.
.
• शिवभोजन केंद्र चालू ठेवावीत. दोन व्यक्तींमध्ये किमान ३ फुटाचे अंतर ठेवण्याची जबाबदारी
केंद्र प्रमुखांची राहील.
• हॉस्पीटल व संबंधित सर्व वैद्यकीय आस्थापना तसेच त्यासंबंधी उत्पादन व वितरण करणारे
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील घटक
दूरध्वनी संदेश वहन, इंटरनेट सेवा, प्रसारण सेवा, केवल सेवा, व त्यासंबंधित अत्यावश्यक सेवा
देणारे घटक तथापि त्यांनी शक्यतो घरात राहूनच काम करावे.
शितगृहे आणि गोदामे कोठार गृहांची सेवा
मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे
• एल.पी.जी., पेट्रोलियम आणि गॅस साठवणूक व वितरण
सुरक्षा सेवा व खाजगी सुरक्षा सेवा
अत्यावश्यक सेवा (उदा.वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम, राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग (फक्त कर्तव्यार्थ व
तातडीचे असल्यास)
शासन व रेल्वेसंबंधी अत्यावश्यक असणारी माल गोदामे व त्यासंबंधित वाहतूक करणारी यंत्रणा
.
वीज उत्पादन, वहन आणि वितरण इ.चे युनिट आणि सेवा, वीज, पाणी पुरवठा आणि स्वच्छता
सेवा.
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणा-या उदा.अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट इ. सुरु राहतील.
आवश्यक सामान उदा. अन्नधान्य, औषधे, मेडीकल उपकरणे इ.चे ई-कॉमर्सव्दारे वितरण
• शेती माल आणि अन्य वस्तूंची आयात-निर्यात
७) औद्योगिक आस्थापना, कार्यशाळा पुर्णपणे बंद राहतील.
तथापि खालील आस्थापना यांना बंद मधून सुट देण्यात येते.
जिवनावश्यक सेवा उत्पादने उदा. दुध, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, औषध निर्मिती विक्री व
वितरण करणारी यंत्रणा, लस, सॅनिटायझर, साबण, पावडर, मास्क, वैद्यकीय उपकरणे इ.
राज्य सरकारने परवानगी दिलेले पुर्णवेळ चालणारे उत्पादन युनिट
सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा बंद राहतील.
अ)
कोणत्याही रस्त्यावर सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणा-या
मोटारसायकल (गिअरसह शिवाय), सर्व प्रकारच्या तीन व चार चाकी वाहने, हलकी वाहने,
मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांची वाहतुक.
खाजगी प्रवासी वाहने तसेच सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी (अप आधारीत ओला, उबेर व तत्सम
वाहनांसह) यांची वाहतुक
तथापि खालील वाहतुकीस बंद मधून सुट देण्यात येते.
भाजीपाला, दुध, पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ व इतर जिवनावश्यक वस्तू तयार करणा-या
आस्थापना, पैकेजिंग करणा-या, साठविणा-या आस्थापना/गोदामे, वितरक, वाहतुक करणारी
वाहने, वरील आस्थापनामध्ये काम करणा-या
कर्मचारी वर्गाच्या बसेस तसेच त्यांना या
कामासाठी सेवा पुरविणा-या आस्थापना
• पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित (फक्त कर्तव्यार्थ)
• तातडीचे रुग्णवाहतुक, हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ (फक्त कर्तव्यार्थ)
• जीवनावश्यक सेवा, वस्तू व माल, जसे भाजीपाला, दुध, अन्नधान्य, चिकन, अंडी, किराणा
सामान इ. यांची वाहतुक
प्रसारमाध्यमे व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कर्तव्यार्थ)
• भाजीपाला विक्री करणारे यांना रस्त्यावर फिरुन भाजीपाला विक्री करता येईल.
• जिवनावश्यक, अत्यावश्यक महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तूंची माल वाहतुक
• अग्निशमन सेवा, कायदा व सुव्यवस्था आणि तातडीच्या (Emergency) सेवा.
• शेतमाल, शेती उत्पादने आणि इतर जिवनावश्यक वस्तू आयात व निर्यात करणारी यंत्रणा
ई-कॉमर्स व्दारे पुरवठा होणारी जिवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू उदा. अन्न, औषधे आणि
वैद्यकीय उपकरणे.
• टँकरद्वारे पाणी पुरवठा करणा-या सेवा.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रवाशांच्या हालचालीसाठी पोलीस आयुक्तालय
हद्दीतील सीमा बंद करण्यात येत आहे तसेच सर्व प्रकारची वाहतुक खाजगी यंत्रणेसह बंद
करण्यात येत आहे. परंतु महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू व वस्तूंच्या वाहतुकीसाठी परवानगी
देण्यात येत आहे.
• सार्वजनिक वाहतुक सेवा बंद असतील. वैद्यकीय तातडीच्या कारणासाठी आवश्यक असणारी
वाहतुक व्यवस्था चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. खाजगी वाहनांचा वापर
जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा आणि या आदेशाखाली परवानगी दिलेल्या सेवा यांच्या पुरता
मर्यादित असेल. अत्यावश्यक वस्तू, आरोग्य सेवा आणि अधिसुचनेत नमुद करण्यात आलेल्या
बाबी या करीता वाहनचालकाव्यतिरीक्त एका व्यक्तीला खाजगी वाहन उपयोगात आणता येईल.
ज्या व्यक्ती, अत्यावश्यक सेवा पुरविणारे, बंद मधून सुट देण्यात आलेले (शासकीय वाहने
सोडून) यांना वाहन वापरणे गरजेचे असल्यास तसा वाहन वापरण्याचा (सायकल, दुचाकी,
चारचाकी) परवाना (पास) बंधनकारक राहील.
वर नमुदप्रमाणे सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी, मिडीया प्रतिनिधी तसेच खाजगी व्यक्ती
यांनी त्यासाठी ओळखपत्र पास व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी
आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल.
०९. आदरातिथ्य सेवा (Hospitality services) पुर्णपणे बंद राहतील.
तथापि खालील आस्थापना यांना बंद मधून सुट देण्यात येते.
ज्या हॉटेल्स, होमस्टेज, लॉजेस आणि मॉटेल्स ज्यामध्ये संचारबंदीचे काळात अडकून पडलेले
पर्यटक किंवा वैधकीय आणि अत्यावश्यक स्टाफ ठेवण्यात आलेला आहे.
• क्वारंटाईनसाठी निवडण्यात आलेल्या आस्थापना
१०. अंत्यविधीकरीता फक्त २० लोकांना परवानगी देण्यात येत आहे. संबंधितांनी हजर लोकांची यादी
ठेवणे बंधनकारक राहील.
११.
पुर्वनियोजित विवाह समारंभ (कमाल ५० व्यक्तीपुरता मर्यादित) तसेच संबंधितांनी हजर लोकांची
यादी ठेवणे बंधनकारक राहील.
उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेवून खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल स्वरुपात काऊंटर
तसेच इतर मार्गानी विक्री वितरीत करण्यास परवानगी राहील.
सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास असणा-या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती
खबरदारी घेवून रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील.
ज्या आस्थापना (माहिती व तंत्रज्ञान उद्योग), ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या
(क्रिटीकल-नॅशनल अँड इंटरनेशनल इन्फ्रास्ट्रक्चर) उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर
आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित
उपक्रम कार्यान्चित राहू शकतील. (परंतु या दृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या
आवश्यकतेबाबत पोलीस आयुक्त कार्यालयास विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे.)
प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे देनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनल इ.) कार्यालये
जे लोक दिनांक १५/०२/२०२० रोजी नंतर सोलापूर शहरात आलेले आहेत. त्यापैकी ज्या
लोकांना वैद्यकीय तपासणी अंती होम क्वारंटाईन केलेले असल्यास अशा व्यक्त्ती इतरत्र
आढळल्यास भादंविसंक १८८ प्रमाणे कारवाईस पात्र राहतील व त्यांना संस्थात्मक विलगीकरण
सेवेत स्थलांतरीत केले जाईल.
0 Comments