कविता : !! पोलीस ऋण!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

कविता : !! पोलीस ऋण!!

!! पोलीस ऋण!!
काय काय करावं पोलीसांनी
समाजाच्या रक्षणासाठी
सणवार उत्सवाचे संरक्षण
आता कोरोनाला रोखण्यासाठी!
महामारीचा विषाणू आला
बंद पडली जग रहाटी
पोलीसदादांचा खडा पहारा
सोबतीला हातात काठी!
काठी मारुन आनंद होतो का?
आमच्या पोलीसदादांना
समाज्याच्याच भल्यासाठी
प्रसाद देतात नासमजदारांना !
आम्हाला सांगतायत घरात बसून
कुटुंबियामधे रमायला
यांचे कुटुंब डोळे लावून बसते
सुखरुप
यावेत जेवायला!
आई वडील मुलं बाळं
सारेच होतात चिंतातूर
अर्धांगीनीच्या जीवाची उलघाल
काळजीचं मनात काहूर !
तीळ तीळ जीव तुटतो
त्या माय माऊलीचा
पण खंबीरपणे साथ देते
कारण वसा सदरक्षणाचा!
नाही कळत वेदना मनातील
सारेच असतात अनभिज्ञ
संसाराची दुःख बाजूला
समोर कर्तव्याचा यज्ञ!!
रात्र नाही दिवस नाही
येवो कितीही बाका प्रसंग
जयहींदचा नारा देताच
मनी समाजरक्षणाचे तरंग !
काय वर्णावं कौतुक पोलीसांचं
मर्यादाच येतात शब्दाला
साथ देऊ , ऋणात राहू
सलाम त्यांच्या कर्तृत्वाला !!

प्रशांत पाटील ,
सोलापूर , ९४२२०६६२९१

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages