तळपत्या उन्हात गॅस टाकी खांद्यावर घेऊन घरपोच सेवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

तळपत्या उन्हात गॅस टाकी खांद्यावर घेऊन घरपोच सेवा

तळपत्या उन्हात गॅस टाकी खांद्यावर घेऊन घरपोच सेवा


अकलूज (  प्रतिनिधी ) नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून शहा धारशी जीवन कंपनी अकलूज यांनी ९५ टक्के ग्राहकांना गॅस टाकीची घरपोच सेवा देत असून तळपत्या ऊन्हात गॅस एजन्सीचे कर्मचारी भारदार वजनाची गॅस टाकी खांद्यावर घेऊन घरपोच करीत आहेत.
          कोरोना सारख्या महाभयानक अदृश्य विषाणूने जगावर आक्रमण केले आहे. आपल्याकडील शिरकाव पाहता चिंतेची बाब बनली असून त्यावर मात करण्यासाठी आपले शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा, डॉक्टर यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. देशात लॉक डाऊनची  परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. अशातच फक्त जीवणावश्यक वस्तू खरेदी सोडली तर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. या अनुषंगाने नागरिकांनी गॅस टाकी साठीही घराबाहेर येऊ नये याची दक्षता शहा धारशी जीवन कंपनीने घेतली असून ग्राहकांना घरपोच गॅस सुविधा देत आहेत. तर कर्मचाऱ्यांचीही काळजी घेत, प्रत्येक कर्मचाऱ्यास मास्क,व  सॅनिटायझर देण्यात आले आहेत. गॅस टाकी घरपोच मिळत असल्यामुळे ग्राहक समाधान व्यक्त करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages