धन्यवाद टोपे," महाराष्ट्राला आपला अभिमान आहे"!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

धन्यवाद टोपे," महाराष्ट्राला आपला अभिमान आहे"!!

धन्यवाद टोपे," महाराष्ट्राला आपला अभिमान आहे"!!


     महाराष्ट्र हे संतांचे राज्य म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्राला संत विचार आणि आचाराची फार मोठी परंपरा आहे,आज महाराष्ट्र किंबहुना जगातील परिस्थिती लक्षात घेता "कोरोना" ने जगाला घातलेला विळखा आजच्या घडीला धोक्याची घंटा देत आहे, विकसित म्हणणाऱ्या देशाने ही या महाभयंकर रोगापुढे गुडघे टेकले आहेत, श्रद्धेची मंदिरे बंद झालेली आहेत.मात्र महाराष्ट्राच्या मातीने कधीही कुणापुढे गुडघे टेकले नाहीत, आणि यापुढे टेकणार ही नाहीत,कारण महाराष्ट्रातील दोन महारथीने वेळीच आणि अचूक नियोजन केल्याने कोरोना वर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. ते दोन महारथी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे होय.

     आज सोशल मीडियाचा प्रारंभ करताना राजेश टोपे यांचे नाव सर्वत्र फिरताना दिसत आहे. राज्याचा आरोग्यमंत्री कसा असावा,याचे आदर्श उदाहरण त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्राला करून दिले आहे.महाराष्ट्र शासन किंबहुना राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग करीत असलेली कामगिरी दमदार आहे.महाराष्ट्रातील जनतेला जेव्हा आधाराची गरज वाटेल तेव्हा तेव्हा टोपेनी त्यांच्याशी संवाद साधला आणि कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या संबंध महाराष्ट्राला आधार दिला.आज राज्यातील कोरोनाचा आकडा जरी तीनशेपार असला तरी कोरोनाने ठणठणीत झालेल्याची संख्या ही विसरून चालणार नाही. म्हणून संकटाच्या काळात आणि महाराष्ट्रावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी या माणसाने सर्व शासकीय यंत्रणेला आणि आरोग्य विभागाला विश्वासात घेवून 'कोरोना' विरुद्ध लढण्याचे बळ संबंध महाराष्ट्रातील जनतेला देत आहेत. म्हणून तर महाराष्ट्रातील जनता "धन्यवाद राजेश टोपे, महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान वाटतो आहे"असे उदगार अंतकरणापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काढत आहे.

       घनसावंगी जि जालना या मतदारसंघाचे आपण नेतृत्व करत असताना नेहमीच आपल्या कामाच्या माध्यमातून आपण मतदारसंघातील जनसामान्यांचा मोठा आधारवड निर्माण केला आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आपले नेतृत्व जनसामान्यांसाठी आपलेपणा निर्माण करीत आहे, आणि हाच आपलेपणा आपण आरोग्य मंत्री झाल्यानंतर आणि महाराष्ट्रावर ओढावलेल्या "कोरोनारुपी" संकटाच्या वेळी वेळोवेळी दाखवला आहे.स्वतःची आई मुंबईच्या हॉस्पिटल मध्येअतिदक्षता विभागात असताना आपण तिथे जावून मातृत्वाचे नाते निभावले आणि तिथून बाहेर येताच मुंबईतील रेल्वेस्टेशनला भेट देऊन कोरोना रोगांच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा अंदाज घेत  आपण तमाम महाराष्ट्रातील जनवात्सल्याचा आदर करता ही महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आदर्शवत गोष्ट आहे ,म्हणून तर महाराष्ट्राला आपला अभिमान आहे.  राजकारणात येवू पाहणाऱ्यांना टोपेचे आरोग्यमंत्री म्हणून केलेले कार्य बरेच काही शिकवण देते.आजपर्यंत आपण केलेल्या कार्यावर महाराष्ट्रातील जनता खुश आहे,हे नाकारून चालणार आहे.

    आज कोरोनाने संपूर्ण देश लॉक डॉउन असताना  आणि सर्वत्र संचार बंदी असताना आपण महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी  प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून आढावा स्वरूपात घेत आहात. सोशल मीडियाचा वापर ही आपण खुबीने करीत आहात, आणि महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाला पळवून लावण्यासाठी बळ देत आहात,ही गोष्ट कोरोना हद्दपार झाल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्र लक्षात ठेवेल.अशा गंभीर परिस्थितीत आपला  संयमआणि धीर ही महाराष्ट्राने या वेळी पाहिला आहे, वेळोवेळी आपण पोलीस प्रशासन,विविध सामाजिक संघटना,राजकीय संघटना यांचेही सहकार्याबदल आभार मानले आहेत.संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाने घातलेला विळखा लवकरात लवकर दूर व्हावा,हीच अपेक्षा !!


   -जगन्नाथ तुकाराम साठे (विभागीय सह संपादक)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages