डॉक्टर देव
कोरोनाचं भय आता
मनामनात भरलं आहे
नातेवाईक मित्रमंडळींना
संशयानं घेरलं आहे !
सख्खा असो रक्ताचा असो
संपर्क नाही ठेवत कोणाशी
पण जात धर्म ठेवून बाजूला
डॉक्टरंच उभा पाठीशी !
कोरोनाचं युद्ध आता
समोरासमोर सुरु आहे
युद्धाचे पहीले सैनिक
डॉक्टर नर्स हेच आहेत!
मृत्यूच्या दाढेत जाऊन
देशवासीयांना वाचवतायत
स्वार्थाचा विचार नाही
कर्तव्याला जागतायत !
त्यांनाही आहे कुटुंब
तितक्याच जीवाभावाचं
चीवीस तास कोरोनासोबत
काय होत असेल मनाचं !
पैसा आडका ऐश्वर्य
सगळंच यथायोग्य आहे
पण कर्तव्य आणि निष्ठेसमोर
सारं काही नगण्य आहे !
काय असेल मनस्थिती
यांच्या कुटुंबियांची
उलट सुलट विचार मनात
टांगती तलवार संसर्गाची !
कोरोनाच्या हल्ल्यानं
आम्ही रमतोय कुटुंबात
वैद्यकीय सेवा देणारे मात्र
रोज यमाराजाशी लढतात !
देवासारखा धाऊन आलास
ही म्हणण्याची रीत आहे
कोरोनातून वाचण्यासाठी मात्र
आता डॉक्टरच देव आहे !
देशवासीयांच्या रक्षणासाठी
आयुष्य लावत आहेत पणाला
नक्की परतवणार दुष्ट कोरोना
दंडवत निस्वार्थ कर्तव्याला !!
प्रशांत पाटील, सोलापूर
९४२२०६६२९१
No comments:
Post a Comment