Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकांनी मोकाट फिरू नये त्यांच्यामध्ये कोरोना ची भीती निर्माण व्हावी यासाठी मोडनिंब ग्रामपंचायतीने राबवलेली युक्ती

नागरिकांनी मोकाट फिरू नये त्यांच्यामध्ये कोरोना ची भीती निर्माण व्हावी यासाठी मोडनिंब ग्रामपंचायतीने राबवलेली युक्ती


मोडनिंब- कोरोना विषाणूचा राक्षस बाहेर तुमची. वाट बघत बसला आहे, घराबाहेर पडाल तर कोणत्याही वेळी हा तुमच्यावर हल्ला करू शकतो आणि तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर महामारीच संकट घेऊन येऊ शकतो म्हणून "पूर्ण वेळ घरात राहू कोरोनावर मात करू" असा संदेश देणारा मनुष्य देखावा आणि रांगोळी सादर करण्यात आली. मोडनिंबमध्ये गुरुवारी भाजी मंडईत उभा केलेला मनुष्य देखावा येथील वेताळ देवस्थान यात्रेतील सोंगांच्या गाड्या उभारणाऱ्या तरुणांच्या संकल्पनेतून साकारला होता यातून जनजागृतीचा उद्देश समोर ठेऊन लोकांना आजाराची गंभीरता आणि घरात राहून घ्यावयाची काळजी हा संदेश मिळत होता. शहराच्या मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती चौकात प्रतिकात्मक कोरोना विषाणू राक्षसाच्या वेशात उभा होता याला पाहून लोक आजाराचे गांभीर्य जाणून घेऊन गरजेच्या वस्तू घेऊन घराकडे जात होते.
Reactions

Post a Comment

0 Comments