Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे हतबल झालेल्या गरजुंना स्वर्गीय अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठानचा दिलासा लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज मोफत अन्नदान सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोरोनामुळे हतबल झालेल्या गरजुंना स्वर्गीय अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठानचा दिलासा
लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज मोफत अन्नदान
सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



मोहोळ ; स्वर्गीय अभिजीत दादा क्षिरसागर प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना सांसर्गिक रोगांच्या संकटामुळे उद्भवलेल्या प्रसंगामुळे गोरगरीब व गरजू साठी अन्नदान या आदर्शवत उपक्रमाची सुरवात दि ०६/०४/२० रोज सकाळी ११ ते १ व सांय ६ ते ८ पर्यंत लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत अन्नदान करण्यात येणार आहे अशी माहीती प्रतिष्ठानचे सचिव तथा मोहोळ नगरपरिषद चे भाजपा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांनी दिली . यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर , प्रतिष्ठिन चे अध्यक्ष सोमेश आबा क्षीरसागर, मुजीब मुजावर, युवामित्र नवनाथ चव्हाण, भाजप सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सागरदादा लेंगरे, प्रशांतजी गाढवे, तन्वीर शेख, औदुबर वाघमोडे, पप्पू लांडगे, नागजी थिटे, मुन्ना झुंजार, सद्दाम बॉंगे, द्रोणा लेंगरे , अक्षय महामुनी, अतिक मुजावर, गणेश लेंगरे, सुनील गाढवे, प्रदीप शिंगाडे, गणेश लेंगरे,अमोल बेंद्रे, समाधान कोळी, आण्णा पवार तसेच प्रतिष्ठान चे स्वयंसेवक उपस्थित होते . ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अभिजीत दादा क्षिरसागर प्रतिष्ठानने आतापर्यंत विविध सामाजिक ऋण व्यक्त करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. शिवाय दोन दिवसापासुन क्षीरसागर परिवाराच्यावतीने गोरगरीब निराधार व बाहेरून आलेल्या आणि उघड्यावर आपला संसार थाटलेल्या अनेकांना जीवनावश्यक साहित्याच्या पिशव्या घरपोच प्रदान करण्यात आल्या. कोरोनाने संपूर्ण देश आणि जग हतबल झालेले असताना समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुशील भैया क्षिरसागर आणि त्यांच्या मित्र परिवाराने स्व . अभिजीत दादा क्षिरसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल सामान्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments