Hot Posts

6/recent/ticker-posts

कोणत्या वयोगटातील कोणाला कोरोनाची लागण झाली पाहूयात…

कोणत्या वयोगटातील कोणाला कोरोनाची लागण झाली पाहूयात…


मुंबई | कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा ७८१ झाला असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ६० वर्षांवरील २० ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

कोणत्या वयोगटातील कोणाला कोरोनाची लागण झाली पाहूयात…

३१-४० वयोगटातील १२८ जणांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
४१-५० वयोगटातील १३३ जणांना लागण झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
५१-६० वयोगटातील ८८ जणांना बाधा झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
६१-७० वयोगटातील ७३ जणांना लागम झाली असून १४ जणांना मृत्यू झाल आहे.
७१-८० वयोगटातील ७३ जमांना लाघण झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
८१-९० वयोगटातील ९ जणांना लागण झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची ही यादी आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेना युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या चाचणी केंद्रात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments