Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीयकार्याचे उदात्त उदाहरण; जवळा येथे भव्य रक्तदान शिबीरास २०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

राष्ट्रीयकार्याचे उदात्त उदाहरण जवळा येथे भव्य रक्तदान शिबीरास २०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान



    सांगोला प्रतिनिधी : कार्यतपस्वी आमदार काकासाहेब  साळुंखे पाटील यांच्या ४८ व्या  पुण्यतिथीचे अाैचित्य साधून कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना मदत करण्याच्या दृष्टीने व राष्ट्रीयकार्याचे उदात्त डोळ्यासमोर ठेवून जवळा येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रेरणेने भव्य रक्तदान शिबीर अयोजीत करण्यात आले होते. राष्ट्रीयकार्याचे उदात्त उदाहरण जवळा येथे भव्य रक्तदान शिबीरास २०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
      संपूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून देणार्‍या कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यातील जनतेवर असुरक्षिततेचे व सावट पसरले आहे. त्यामुळे राज्यात वाढत असलेल्या रुग्णांची साखळी पाहता भविष्यात देशाला रक्ताची मोठी गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाने प्रशासना बरोबर जवळा व परिसरातील नागरिकांचे योगदान म्हणून ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या सूचनेनुसार जवळ ग्रामस्थांच्यावतीने काल तीन मार्च रोजी रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून जवळा तालुका सांगोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी युवक नेते यशदादा साळुंखे पाटील यांनी पहिल्यांदाच रक्तदान करून तमाम जवळेकरांपुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व कृषी खात्याचे सभापती अनिल मोटे जिल्हा परीषदेचे सदस्य गणेश कांबळे सांगोला पंचायत समितीचे मा. उपसभापती- प्रतिनीधी योगेशदादा खटकाळे यांच्यासह जवळा व परिसरातील एकूण 201 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता.
ज्या -ज्या वेळी देशावर राज्यावर संकट कोसळले त्या - त्यावेळी जवळा ग्रामस्थांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने साळुंखे-पाटील कुटुंबीयांच्या पुढाकाराने मदतीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सध्या देशावर कोरोना सारख्या आजाराचे सावट पसरले आहे. या काळात शासन- प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जवळा गावात अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. लॉक डाऊन काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही म्हणून सांगोला तालुक्यात प्रथम जवळा गावांमध्ये होम डिलिव्हरी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. गावामध्ये साळुंखे-पाटील कुटुंबियांच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. यासह आता कोरोना बाधित रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून देशातील नागरिकांना या विषाणूपासून बाजूला काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमास गाव परिसरातील नागरिकांनी मोठा उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
Reactions

Post a Comment

0 Comments