आज दि. ०४/०४/२०२० चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास सुंदर अशा लाल रंगांच्या गुलाबांनी सजविण्यात आले. तसेच चैत्री वारी कामदा एकादशी निमीत्त श्री ची पुजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंह ठाकुर व रुक्मिणीमातेची पुजा संभाजीराजे शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदुलवाड उपस्थित होते.
0 Comments