Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोले नगरपरिषद करणार प्रत्येक घराचा सर्व्हे : मुख्याधिकारी कैलास केंद्रे

सांगोले नगरपरिषद करणार प्रत्येक घराचा सर्व्हे;मुख्याधिकारी कैलास केंद्रे;कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रत्येकावर राहणार नगरपरिषदेचे लक्ष

सांगोला - संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा शिरकाव होवूनही आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. तथापि कोरोनाग्रस्त भागातून नागरिकांचे सर्वत्र स्थलांतर होत असून अशाने सांगोले शहरात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी नगरपरिषद शहरातील सर्व नागरिकांचा सर्व्हे करणार आहे. तसेच यातून शहरातील प्रत्येरक नागरिकाच्या आरोग्यावर नगरपरिषदे मार्फत लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती मुख्यााधिकारी  कैलास केंद्रे यांनी दिली.
या सर्व्हेक्षणा दरम्यायन नागरिकांना नगरपरिषद कर्मचा-यामार्फत नांव, वय, पत्ताा, मोबाईलक्र., ताप किंवा खोकला आहे अथवा नाही अशा प्रकारची माहिती विचारली जाईल. 
      सांगोला नगरपरिषदेच्या जवळपास 50 कर्मचा-यामार्फत सर्व शहरात हा सर्व्हे केला जाणार आहे. यापुढे कोरोनाचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत दररोज नगरपरिषदेच्या‍ कर्मचा-यामार्फत नागरिकांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. अशा प्रकारची लक्षणे आढळून आल्यास सदर नागरिकास तात्काळ ग्रामीण रुग्णालयांत तपासणीकरता पाठवून दिले जाईल.
सांगोला वासीयांना या जागतिक महामारीपासून वाचवण्या्साठी सांगोला नगरपरिषद प्रशासनाकडुन सुरु केलेल्या या सर्व्हेक्षणास सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आपल्या आजाराबद्दल किंवा ज्या ठिकाणाहून आपण आला आहेत ते ठिकाण अशी सर्व माहिती न लपवता अचुकपणे सांगणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी आपल्या घरी येणा-या नगरपरिषद कर्मचा-यास खरी माहिती सांगून कोरोनाला आपल्याापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments