Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मी दहिवडी मध्ये भाजी विक्रेत्यांला पोलिसांची अरेरावी; अवैद्य धंदे वाल्यांकडून पेढा खाऊन पोलिसांची कारवाई टाळाटाळ

लक्ष्मी दहिवडी मध्ये भाजी विक्रेत्यांला पोलिसांची अरेरावी; अवैद्य धंदे वाल्यांकडून पेढा खाऊन पोलिसांची कारवाई टाळाटाळ 

मंगळवेढा: प्रतिनिधी  - कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. माञ या संचार बंदी च्या कालावधीत ग्रामीण भागातील शेतकरी आपले कुटुंब चालविण्यासाठी स्वतःच्या शेतातील पालेभाज्या विकत आहे. अशा पालेभाज्या विक्रेत्यांला पोलिसांनी अरेरावी भाषा वापरली आहे.
     लक्ष्मी दहिवडी गावची जवळपास १० हजार लोकसंख्या आहे आजुबाजुच्या गावातील महिला वर्ग पालेभाज्या विकत नेण्यासाठी लक्ष्मी दहिवडी मध्ये येतात. लक्ष्मी दहिवडी तील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मधुकर पाटील व ग्रामपंचायत प्रशासन यांनी पालेभाज्या विक्रेत्यांना ठराविक अंतर ठेऊन पालेभाज्या विक्री करण्यासाठी सांगितले असुन पालेभाज्या विक्रेते व शेतकरी वर्ग नागरिकांना पालेभाज्या विक्री करण्यासाठी गावात येत असतात अशा पालेभाज्या विक्रेत्यांला मंगळवेढा पोलिस स्टेशनचे कर्मचा-यांकडूनच अरेरावीची भाषा वापरली जात आहे.
 गावात अवैद्य धंदे वाल्यांकडून पोलिस गावात येऊन कुंदा, पेढा, शेव चिवडा खाऊन जातात. पोलिस अवैध धंदे वाल्यांना पाठीशी घालतात अन् पालेभाज्या विक्रेत्यांना नाहक ञास देतात. 
     सद्या सर्वञ संचार बंदी असुन जीवनावश्यक वस्तू २४ तास खुल्या ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले असुन पोलिस माञ जाणीव पुर्वक शेतक-यांना ञास देत आहेत. स्वतःच्या शेतातील पालेभाज्या विक्री करण्यासाठी सुद्धा पोलिस कर्मचारी नाहक ञास देत असल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त होत आहे.
 गावात दारू, तंबाखू, गुटखा, पेट्रोल खुले आम विकले जाते. याकडे पोलिस का लक्ष देत नाहीत असा सवाल सुज्ञ नागरिकांतुन केला जात आहे.
    सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील अशा  पोलिस कर्मचा-यांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचेलक्ष वेधले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments