Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाशी लढताना पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळता यावे यासाठी येवले फाऊंडेशनने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले मास्क, सॅनेटायजर व क्रिमरोलचे वाटप

कोरोनाशी लढताना पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळता यावे यासाठी येवले फाऊंडेशनने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले मास्क, सॅनेटायजर व क्रिमरोलचे वाटप

सासवड  (ता. पुरंदर) : आज येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशनच्या वतीने कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर  पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गांचे कर्तव्य बजावत असताना आरोग्य चांगले संगाळता यावे तसेच आजारापासून संसर्ग होवू नये यासाठी सेफ्टी मास्क, सेनेटाजर आणि नाष्ट्यासाठी क्रिमरोल बॉक्सचे वाटप  येवले अमृततुल्यचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी भोर पुरंदरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके साहेब, पोलीस उपनिरीक्षक माने साहेब, पोलीस उपनिरीक्षक घुगे साहेब आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर पुरंदर कार्यालय व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी येवले फाऊंडेशनचे निलेश येवले, विश्वास येवले, निलेश मोरे, अशोक येवले, दत्तात्रेय येवले, दिपक येवले ,पप्पु येवले ,तेजस येवले , संजय येवले , विजय येवले , मंगेश येवले , गणेश येवले , दादा साहेब येवले उपस्थित होते. 
यावेळी सोशल डिशटंशनचे पालन करण्यात आले.

यावेळी नवनाथ येवले म्हणाले की, जीवघेण्या कोरोना वाइरसची लढा देण्यासाठी दिवसरात्र आपल्या  कुटुंबांना सोडून पोलीस, डाॅक्टर, सफाई कर्मचारी वर्ग आपली जीवाची बाजी लावून एक देशभक्ती भावनेने आपले कर्तव्य बजावत आहे. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाशी  लढा देताना आपली एक सामाजिक जबाबदारी व भान  म्हणून या कर्मचारी वर्गांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांना संसर्ग होवू नये  यासाठी येवले फाऊंडेशनच्या वतीने या आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीसांचे कोरोना लढण्यात मोठे योगदान असून त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांच्या कार्याचा गौरव केला . 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव म्हणाले की,  करोना तुमच्या घरी जोपर्यंत येणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला घराबाहेर आणायला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही काही दिवस घरातच रहा . सुरक्षित रहा  शासनाला सहकार्य करत प्रशासनाच्या  सुचनांचे पालन करा हा सर्वात चांगला  उपाय आहे. यावेळी त्यांनी विविध सामाजिक संस्थांनी आपल्या तालुक्यात असलेल्या गोरगरीब, गरजू, मोलमजुरी करून हातावर पोटभरणारऱ्या लोकांना आपल्या पध्दतीने अन्नधान्याचे मदत  करावी. तसेच अनेक सामाजिक संस्था सामाजिक उपक्रम राबवत असल्याबाबत त्यांचे कौतुक करून येवले फाऊंडेशन केलेल्या मदतीबद्दल पुणे  ग्रामीण पोलीसच्या वतीने आभार व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments