Hot Posts

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं !

वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं!


पंढरपूर | पंढरपुरातील चैत्र वारी सोहळ्यात कोरोनाचे विघ्न आल्याने यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आज कामदा एकादशी आहे. यानिमित्ताने वारकऱ्यांची चैत्री वारी असते. चार वाऱ्यांपैकी ही एक महत्त्वाची वारी असून हजारो वारकरी ही वारी करतात. यंदा कोरोनाच्या संकटामुळे ही वारी रद्द करण्यात आली आहे.

वारी रद्द करण्यात आल्यानंतर तसं आवाहन वारकऱ्यांना करण्यात आलं होतं. संकट लक्षात घेता वारकऱ्यांनी ही वारी टाळली आहे. वारकऱ्यांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.
दरम्यान, विठुरायाच्या पंढरीत भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यां पैकी एक असलेला चैत्री एकादशी सोहळा उत्साहाने संपन्न झाला. कोरोना विषाणूच्या संकटामुळे इतिहासात 400 वर्षांच्या वारी परंपरेला भाविकाविना पहिल्यांदाच खंड आला. चैत्री एकादशी निमित्त विठूरायाची महापूजा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यहस्ते तर रूक्मिणीची महापूजा सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments