Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडीत गर्दीच्या ठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण, गावडे

कुर्डुवाडीत गर्दीच्या ठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण, गावडे 

कुर्डुवाडी ; कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शहरातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालय, बँका आदी गर्दीच्या ठिकाण नगरपरिषदे मार्फत सर्वत्र फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे प्रांताधिकारी जोती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम  सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले.
       शहरातील रुग्णालयात येणारे काही रुग्ण हे सर्दी खोकला व ताप आजाराच्या तपासणीसाठी येत असतात तसेच त्यात काही रुग्ण संसर्गजन्य  आजाराचे असतात. संसर्गजन्य आजाराचा धोका लक्षात घेता नगरपालिके मार्फत सर्व रुग्णालये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत.यापूर्वी शहर अग्निशामक व ट्रॅक्टरचा द्वारे सर्वत्र  फवारणी करण्यात आलीआहे. 
     यापुढे अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या टीम ने शहरातील गर्दीच्या ठिकाणी फवारणी सुरू केली  आहे. शहरातील नगरपरिषदेच्या वतीने दवाखाने, बँका, रेशन दुकान, भाजी मंडई, किरण व मेडिकल दुकान आदी ठिकाणी सोडियम हायप्रोक्लोराईड फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. बॅंकांमध्ये सध्या होत असलेली गर्दी पाहता बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आले असून त्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिले असल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments