Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रशासन व टीव्ही सेव्हन च्या वतीने परप्रांतीय रस्ते मजुरांना अन्नधान्य वाटप.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रशासन व टीव्ही सेव्हन च्या वतीने परप्रांतीय रस्ते मजुरांना अन्नधान्य वाटप
तालुक्यात अत्यावश्यक सेवेसाठी मनसे खंबीरपणे उभी राहील: विनोद बाबर  


सांगोला ; सांगोला शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची व हायवेंची कामे सुरु होती. या रस्त्याच्या कामासाठी परप्रांतीय मजूर या ठिकाणी आलेले आहेत पण सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदी कायद्यामुळे त्या रस्ते मजुरांना घरातून बाहेर पडता येत नाही व तसेच सदर रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार व कंपन्यांनी या मजुरांना संचार बंदीमध्ये एकही अन्नधान्याचा दाणा पुरविला नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रशासन व टीव्ही सेवनच्या माध्यमातून रस्ते कामगारांना शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. व तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक सेवेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी दिले.

देशामध्ये वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना राबवली आहे. सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने सांगोला तालुक्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांना रस्ते कॉन्ट्रॅक्टर व कंपनी यांनी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचा एकही कण न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या या परिस्थितीची जाण ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रशासन व टीव्ही सेवन च्या माध्यमातून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच या रस्ते कॉन्ट्रॅक्टदार व कंपन्यांवर मजुरांना अन्नधान्य न पुरवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणल्याने कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सांगोला तलाठी विकास माळी, टी व्ही सेवन चे संपादक चंद्रकांत ऐवळे, मनसे तालुकाध्यक्ष सतीश दिडवाघ, उपाध्यक्ष अक्षय विभुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments