डॉ. धवलसिंहांनी केली पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 4, 2020

डॉ. धवलसिंहांनी केली पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी

डॉ. धवलसिंहांनी केली पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी

 अकलूज ( प्रतिनिधी ) डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे व त्यांच्या कुटुंबासाठी शासनाकडुन विशेष पॅकेज मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.  सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृध्द समाजाचा भक्कम आधार आहे शासन आणी जनतेमधील मुख्य दुवा असणारा हा खांब राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु असतानाही जागृत पत्रकारिता करित आहे.                                      तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील जागृत नागरिकही करीत आहेत, केंद्र व महाराष्ट्र शासनाने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले पासुन पोलीस,डॉक्टर व त्यांचा स्टाफ, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधव ही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती व प्रसिद्धि करीत आहेत.डाॅक्टर ,पोलीस,अथवा,शासकीय अधिकारी यांचे आर्थिक नियोजन फिक्स आहे.  परंतु पत्रकारांना अत्यंत तुटपुंजा पगार असतो. ब-याचशा पत्रकारांचे आर्थिक नियोजन हे जाहीरातीचे कमिशन वर अवलंबुन आहे. सद्धस्थितीत जाहीराती बंद आहेत. अनेक पत्रकार आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे पत्रकारांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो सर्वांचे अडीअडचणीत न्याय मिळवुन देणारे पत्रकारच अडचणीत आले आहेत.बातमीदारीसाठी त्यांना अनेक ठिकाणी फिरून बातमी गोळा करावी लागते. यामुळे इतरांना जसे विमासंरक्षण आहे. तसेच पत्रकारांनाही विमा संरक्षण  मिळावे व  या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने पत्रकारांनाही विशेष आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरळीतपणे  व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages