माढा तालुका "करोना"च्या रडारवर...
पंढरपूर करोना संपर्कातील माढा तालुक्यातील चार गावातील सोळा जणांची सोलापूरला रवानगी...
एका वृद्धाचा मृत्यू...एका संशयित महीलेचा उद्या रिपोर्ट...
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माढा तालुक्यातील पंढरपूर करोना संपर्कातील सोळा जणांची सोलापूरला रवानगी केल्याने तालुक्यात चांगलाच हादरा बसला आहे.
पंढरपूर करोना संपर्कातील तालुक्यातील माढा, मोडनिंब तुळशी, महादेववाडी या चार गावातील सोळा जणांची सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी केली असल्याचे माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पलंगे यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील मौजे तुळशी येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला असून तो न्युमोनियाचा रुग्ण आढळून आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पलंगे यांनी सांगितले.
परंतु मृत वृध्दाच्या संपर्कातील बारा जणांना सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
*मौजे चिंचगाव येथील एका फळविक्रेतेच्या संशयीत वृध्द आईला काल त्रास होत असल्याने बार्शी येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते.परंतु त्यांना सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे*
त्यांचा रिपोर्ट पेंडींग असून उद्या येणार असल्याचे तलाठ्यांनी सांगितले.
एकंदरीत पंढरपूर कनेक्शनमधील करोना रुग्णालयातील संपर्कातील माढा तालुक्यातील चार गावातील सोळा जणांची सोलापूरला रवानगी,एका वृध्देचा रिपोर्ट पेंडीग,वृध्दाचा मृत्यू आदी घटनांमुळे तालुका चांगलाच हादरला आहे.
*तर मुंबई, पुणे आदी शहरातून लपून छपून आलेल्या नागरिकांची माहिती न दडविता संबंधितांना द्यावीत त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील व माहिती दडविणा-यांवर केसेस दाखल करुन त्यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.*
*चोरुन सर्वत्र प्रवेश केलेल्या आगंतुकामुळे आरोग्य, पोलिस, प्रशासनाचा तणाव चांगलाच वाढला असून कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.*
0 Comments