टेंभुर्णी येथील गरीब कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने धान्य किराणा वस्तूचे वाटप
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] टेंभुर्णी येथील शहर व बायपास रोड लाडूळे वस्ती , ननवरे वस्ती येथे शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर (आण्णा) देशमुख व टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्या सौ.उषा मधुकर देशमुख यांचे हस्ते धान्य व किराणा साहित्य वाटप आज सकाळी करण्यात आले.
कोरोना व्हायरसमुळे लाॅकडाऊन असल्याने हातावरचे पोट व अडचणीत असणारे 40 कुटुंबाला आज सोमवार सकाळी 9:30 वाजता धान्य व किराणा साहित्य वाटप करण्यात आले .
शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर (आण्णा )देशमुख
यांच्या मित्र परिवाराने हे साहित्य गरजूना देताना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे,कोरोना व्हायरसांचा जगभर हाहाकार पसरला असून भारतात या महामारीचा सामना केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय काळजीपूर्वक केला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री .उध्दवजी ठाकरे साहेब यांनी जनतेच्या आरोग्याची हॉस्पिटल मध्ये व भोजनाची सोय शिवभोजन मधून चांगले प्रकारे केली आहे ,रेशनचा मोफत 5 कि.तांदूळ व ईतर जे शक्य आहे ते दिले आहे. तरीही कोणी अडचणीत असल्यास विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि व्यावसायिक नोकरदार यांनी गरजूना मदत करावी ,मानवता जपावी, गरजूना साहीत्य वाटप करताना सोशेल डिस्टन्सिंग पाळण्यात आले,
यावेळी फार्मासीस्ट अजिंक्य देशमुख, सिव्हिल इंजिनिअर गणेश देशमुख,दिनेश ढगे,अमोल गणपते भाऊसाहेब थोरात उपस्थित होते.
0 Comments