सांगोला ; (जगन्नाथ साठे) आज लॉक डॉऊन चा 11 दिवस असून या काळात गरजू लोकांची भूक भागावी यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जयराम अँड सुधीर एजन्सी मार्फत एक पाऊल सामाजिकतेकडे या वचनाप्रमाणे सांगोला येथील मिरज रोड जिजामाता नगर येथील नागरिकांना फॉर्च्युन कंपनीचा आटा वाटप करण्यात आला. यावेळी सुधीर दौंडे,जयराम दौंडे उपस्थित होते. दौंडे यांनी सामाजीकतेची जाण ठेवून केलेल्या कार्यामुळे झोपडपट्टीतील लोकांनी त्यांचे आभार मानले.सोशल डीस्टिंगस ठेवा, गरज असेल तर घराबाहेर पडा,गर्दी टाळा,असा सल्ला यावेळी सुधीर दौंडे यांनी उपस्थितांना दिला.
0 Comments