Hot Posts

6/recent/ticker-posts

चेतनसिंह केदार सावंत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ; गरजू लोकांना धान्याचे केले वाटप

चेतनसिंह केदार सावंत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी ; गरजू लोकांना धान्याचे केले वाटप


सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी स्वखर्चातून कडलास, अकोला(वासुद) व वाटंबरे येथील गरजू नागरिकांना धान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. लॉकडाऊनच्या संकटकाळात गरजू नागरिकांना धान्य वाटप करून चेतनसिंह केदार-सावंत यांनी माणुसकीचा धर्म जोपासला.
        कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन झाला आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील मजुरांच्या, हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला आणि खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. 
संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागु केल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना मदतीचा हात म्हणुन भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष, नगरसेवक चेतनसिंह केदार-सावंत हे गोरगरिबांच्या मदतीला धावून आले आहेत.
         रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आलेल्या गरजू नागरिकांना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी कडलास, अकोला(वासुद), वाटंबरे या ठिकाणी धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक केले जात आहे.
       धान्य वाटप करताना भाजपचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक चेतनसिंह केदार सावंत, अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, नगरसेवक जुबेर मुजावर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव शिंदे, वासुदचे उपसरपंच विठ्ठल केदार, डॉ.विजय बाबर, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे, मोहन साळुंखे, डॉ.जयंत केदार, अकोल्याचे माजी सरपंच सोमनाथ शिंदे, पुण्यवंत खटकाळे, हेमंत शिंदे, संजय केदार, दत्तात्रय जाधव, शिवाजीराव ठोकळे, विजय पवार,रावसाहेब पाटील, मधुकर पवार, सूर्याजी खटकाळे, चेअरमन अनिल खटकाळे, अकोल्याचे पोलीस पाटील गणेश खटकाळे, पप्पू पाटील, अनिकेत शिंदे, सुशांत केदार, गणेश केदार, अनिल पवार, उदयसिंह गायकवाड, धनवडे मेजर, अफझल शेख, सोयजित केदार, दीपक केदार, रोहित सावंत, वैभव आंधळगावकर आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments