श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने
*2500 कुटुंबांना शिधा वाटप - किर्तीध्वजसिंह
अकलूज : कोव्हीड 19 अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशात, राज्यात किंबहुना आपल्या जिल्ह्यातही लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांना तर उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नधान्य ही उपलब्ध नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत ही बाब लक्षात घेऊन श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने अकलूज परिसरातील सुमारे 2500 कुटुंबांना घरपोच शिधा वाटप सुरू केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने सध्या जगाला ग्रासले आहे. आपल्या देशातही याचा प्रसार होत असल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणेही मुश्कील झाले आहे. हे जाणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग महर्षि कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने अकलूज परिसरातील 2500 कुटुंबांना शिधावाटप सुरू करण्यात आले असून यामध्ये गहू, तांदूळ, तूरदाळ, हरभरा डाळ, खाद्यतेल, मीठ इत्यादी जिवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरीकांनी स्वागत केले असून त्यांनी गोरगरीबांप्रती दाखविलेल्या तळमळी बद्दल सर्व समाजातून संस्थेचे कौतुक होत आहे.
0 Comments