वालचंद शिक्षण समुहाकडून
वीस लाख रुपयांची मदत
सोलापूर दि. 6
: कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी वालचंद शिक्षण समूहाकडून २० लाख रुपयांचे
अर्थसहाय्य आज देण्यात आले. यातील १० लाख रुपये पंतप्रधान सहाय्य निधी
आणि १० लाख रुपये महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्य निधी मध्ये जमा
केले जाणार आहेत.
भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य
साधून वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त श्री पराग शहा, श्री
वैभव गांधी, श्री ब्रिजेश गांधी यांनी जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन
त्यांच्याकडे मदतीचा धनादेश दिला.
वालचंद शिक्षण समूहाच्या
वतीने दिली जात असलेली ही आर्थिक मदत म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे. अनेक समाजोपयोगी
संशोधन करून या शिक्षण समूहाने राष्ट्रीय पातळीवर आपले योगदान देत आहे. वालचंद शिक्षण
समूहातून शिक्षण घेऊन आज अनेक विध्यार्थी विविध संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत
मोठे योगदान देत आहेत, असे श्री. रणजित गांधी यांनी सांगितले.
0 Comments