सोलापुरात आजपासून
मोबाईल डिस्पेन्सरीची सेवा
सोलापूर दि. 6 : लॉकडाऊनच्या कालावधीत ज्येष्ठ
नागरिक, दिव्यांग आणि गरजूंना आरोग्य तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून फिरता दवाखाना
(मोबाईल डिस्पेन्सरी) सुरु करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर महानगरपालिका
आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने ही सेवा सुरु करण्यात येत आहे.
या फिरत्या दवाख्यानामध्ये वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर
आजारी व्यक्तींच्या घरात जाऊन तपासणी करतील, वैद्यकीय सल्ला देतील. शहर हद्दीतील गावठाण
भागात सकाळी 10 ते 2 तर जुळे सोलापूर परिसरात दुपारी 2 ते 6 या कालावधीत हा दवाखाना
उपलब्ध असेल. या दवाखान्यातून दिली जाणारी वैद्यकीय सेवा मोफत आहे. रुग्णांनी श्री.
श्याम पाटील (8999908660) यांच्याशी संपर्क साधावा.
य मोबाईल डिस्पेंन्सरीच्या कामकाजास आज जिल्हाधिकारी
कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, भारतीय जैन
संघटनेचे उपाध्यक्ष केतन भाई शहा, श्याम पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप कुमार
ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.
या स्वरुपाच्या वैद्यकीय सेवेची व्याप्ती
वाढवण्याची जिल्हा प्रशासन विचार करत आहे. तरी स्वेच्छेने वैद्यकीय सेवा देण्यास इच्छुक
असणारे डॉक्टर आणि परिचारक यांनी श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी
मिलिंद शंभरकर व भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन भाई शाह यांनी केले आहे.
0 Comments