Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था यांना मदतीसाठी आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन

पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची  कोटी रुपयांची मदत
दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था यांना मदतीसाठी  आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन


पुणे,दि.७: कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस  पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर  यांनी आज १ कोटी रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाच्या भीषण संकटातून सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून श्री. पुसाळकर यांनी ही मदत पंतप्रधान सहायता निधीस सुपूर्द केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राममहाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनचे विकास काकतकर,पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील,निवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश केकाण उपस्थित होते.
कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून याप्रसंगी दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेहे समाजातील सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी अधिकाधिक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
आजवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ६७ हजार तर पंतप्रधान सहायता निधीसाठी ३ लाख ६६ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जमा झाला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments