अत्यावश्यक आणि मुलभूत सेवा सुरू राहणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 8, 2020

अत्यावश्यक आणि मुलभूत सेवा सुरू राहणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

अत्यावश्यक आणि मुलभूत सेवा सुरू राहणार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश


            सोलापूर दि. 8 :- लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्यक आणि मुलभूत सेवा सुरळीत राहव्यात यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे, विजवितरण, दुरध्वनी सेवा, पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छतेबाबतची अनुषंगिक  कामे सुरु राहतील.
            संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक मुलभूत सेवा देणा-या विभागांना सेवा संचालनामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे संबंधित विभागांनी कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
            या आदेशानुसार राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे, दुरुस्ती करणे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील पोल उभारणे, देखभाल दुरुस्ती कामे सुरु राहतील. पाणी पुरवठा, जल निस्सारण आणि स्वच्छता ही कामे सुरु राहतील.
            भारत संचार निगम लिमीटेड आणि खासगी दूरसंचार कंपनीकडे दुरसंचार आणि इंटरनेट सेवा दुरुस्तीची कामे सुरु राहतील. ही कामे सुरु राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या जिल्हा स्तरीय अधिका-यांनी लेखी आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
            मात्र यासाठी नमूद अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्तीचे आदेश संबंधित विभागानी काढावयाचे आहेत. या आदेशाची प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र आणि आदेशाची प्रत सोबत ठेवावी. काम करताना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे  या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages