कर्तव्यावर असल्याचा पुरावा शासकीय कर्मचा-यांना बंधनकारक
सोलापूर दि. 8 :- संचारबंदीच्या कालावधीत शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी घराबाहेर पडताना कर्तव्यावर असल्याबाबतचा पुरावा जवळ बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा अशा शासकीय कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंद यांनी या आदेशान्वये दिला आहे. याबाबत श्री. शिंदे यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) प्रमाणे सुधारित मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशात नमूद केले आहे की, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 14 एप्रिल रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचार बंदीचे आदेश कायम ठेवून सुधारित आदेश जारी केले जात आहेत. यानुसार किराणा माल दुकानदारांना दुकानाच्या परिसरातच घरपोच सेवा देता येईल. नागरिकांनी घराच्या परिसरातीलच औषध दुकानातून औषधे मागवावीत.
0 Comments