आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (1) लागू
सोलापूर दि. 8 :- सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये आदेश लागू केले आहेत. हा आदेश 09 ते 23 एप्रिल 2020 पर्यंत लागू राहील.
आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हाव भाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर निती विरूध्द निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होवून अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्त ऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे यास मनाई करण्यात आली आहे.
सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्रधिकरणाची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments