Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितदादांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यात वैद्यकीय उपकरणे

रणजितदादांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुक्यात वैद्यकीय उपकरणे                                       
अकलूज ; रुग्णांवर उपचार करताना कोणताही व्हायरस फिल्टर करणारे महत्वपूर्ण असे एन -९५ हे विशेष मास्क१५०० व ५०० प्लास्टिक गाऊन माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांसाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे यांनी दिली. टंचाईच्या काळातही माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होत असल्याचे डॉ. एकतपुरे यांनी सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन या तीन संघटनांचे एकूण ७०० डॉक्टर्स माळशिरस तालुक्‍यांमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत.सध्या कोरोना संसर्गाच्या भयभीत वातावरणामध्ये अगदी जीव मुठीत घेऊन या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा पुरवाव्या लागत आहेत. माळशिरस तालुक्यात आतापर्यंत एकहि कोरोना संसर्गाचा रुग्ण सापडला नसला तरी तालुक्यात राजकीय,प्रशासकीय व सामाजिक पातळीवर विशेष दक्षता घेतली जात आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील अधिकांश डॉक्टरांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट किट ( पीपीई ), एन -९५ हे विशेष मास्क, प्लास्टिक गाऊन मिळावेत अशी मागणी सर्व डॉक्टरांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासकीय व वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. माजी खासदार मोहिते पाटील  यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण असे१५००  एन -९५ हे विशेष मास्क माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांना उपलब्ध झाले आहेत. प्रचंड अशा तुटवड्याच्या कालावधीतही हे महत्वपूर्ण मास्क उपलब्ध झाल्याने तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय ५०० प्लास्टिक गाऊन उपलब्ध झाले असल्याचे डॉ. नितीन एकतपुरे यांनी सांगितले.
चौकट...
एन -९५ हे मास्क सर्व प्रकारचे व्हायरस तीन टप्प्यात फिल्टर करते .रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांसाठी हे खूप महत्त्वपूर्ण असते. सध्या याचा मोठा तुटवडा आहे .माळशिरस तालुक्यात सरकारी डॉक्टरांना अशा प्रकारचे केवळ ५० मास्क मिळाले आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील खाजगी डॉक्टरांना तब्बल १५०० मास्क मिळाल्याने डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देणे सुलभ होणार आहे. त्याशिवाय ५०० प्लास्टिक गाऊन उपलब्ध झाले आहेत.पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. असे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे (निमा)तालुका अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील यांनी सांगितले.
कोट...
माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांना महत्त्वाची उपकरणे उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दवाखान्यास दिल्ली सरकारच्या धर्तीवर एक कोटीचे विमा कवच मिळावे यासाठी आम्ही रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. सध्या डॉक्टरांना वैयक्तिक पातळीवर पन्नास लाखांच्या विम्याचे कवच आहे ,परंतु दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनाही विमा कवच मिळण्याची गरज आहे.
डॉ.पृथ्वीराज माने -पाटील, माळशिरस तालुका अध्यक्ष ,होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन
Reactions

Post a Comment

0 Comments