मराठा समाज सेवा मंडळाच्या संचालकांची बिनविरोध निवड. सपाटे सहाव्यांदा अध्यक्ष तर माने दुसऱ्यांदा जनरल सेक्रेटरी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 5, 2020

मराठा समाज सेवा मंडळाच्या संचालकांची बिनविरोध निवड. सपाटे सहाव्यांदा अध्यक्ष तर माने दुसऱ्यांदा जनरल सेक्रेटरी.

मराठा समाज सेवा मंडळाच्या संचालकांची बिनविरोध निवड.
सपाटे सहाव्यांदा अध्यक्ष तर माने दुसऱ्यांदा जनरल सेक्रेटरी.

        सोलापूर दि.५ - येथील मराठा समाज सेवा मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
होवून अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा माजी महापौर मनोहर सपाटे तर दुसऱ्यांदा जनरल सेक्रेटरी
म्हणून प्रा.महेश माने यांची निवड करण्यात आली.
        मराठा समाज सेवा मंडळाच्या २०२० ते २०२५ या सालासाठी झालेल्या या पंचवार्षिक
निवडणुकीत पाच पदाधिकारी व दहा संचालकांचीही बिनविरोधच निवड केली गेली. ती
पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष-विनायक पाटील, खजिनदार-शहाजी सुर्वे (गुरुजी) तर सेक्रेटरी म्हणून
नामदेव थोरात यांची तर मोहन गोरे, निवृत्ती केत या जुन्या संचालकासह वसंत सावंत, महादेव
गवळी, ज्ञानेश्वर सपाटे, प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, सूर्यकांत इंगळे, सुनिता साळके व
माजी नगरसेविका रेखा सपाटे या नव्यांचा संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. परंतु
या नव्या संचालक मंडळातून काही जुन्या दिग्गज संचालकांना वगळून सपाटे यांनी जोरदार
धक्का दिला असून त्यामध्ये खुद्द सपाटे यांचे चिरंजीव अॅड.बाबासाहेब सपाटे यांनाही डच्चू
देण्यात आला आहे तर अॅड.दादासाहेब देशमुख, अॅड.दत्तात्रय पवार, हरिश्चंद्र बचुटे, हणमंतू
बेसुळके व सुशिला शिदे या जुन्या संचालकांनाही सपाटे यांनी थेट घरचा रस्ता दाखवून मराठा
समाज सेवा मंडळावरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
         विशेष म्हणजे या नव्या संचालक मंडळात देखील सपाटे यांनी आपले पुत्र
अॅड.बाबासाहेब सपाटे यांना वगळले असले तरी आपली भावजय माजी नगरसेविका रेखा सपाटे
व पुतण्या ज्ञानेश्वर सपाटे यांनाही संचालक मंडळात घेऊन घराणेशाहीला नव्याने जागा निर्माण
करुन दिल्याचे बोलले जात आहे. यात केवळ सपाटे परिवारालाच संधी देण्यात आली आहे
असे नव्हे तर प्रभाकर खंडाळकर व सुनिता साळके या दोन नव्या संचालकानांही
घराणेशाहीतूनच संचालक मंडळात पुढे आणून संस्थेला मोठे योगदान दिलेल्या साळुके व
खंडाळकर परिवारालाही त्यांनी न्याय मिळवून दिल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages