मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कुर्डु ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कुर्डु ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कुर्डु ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर


कुर्डु (कालीदास जानराव)-संपूर्ण जग कोरोनाच्या भयंकर सावटाखाली असताना देशभरात लॉकडाउन सुरू आहे.सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.शासन सर्वोतोपरी उपाय योजना करत आहे.सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना राज्याचें मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साथ देत कुर्डु ता.माढा ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमास कुर्डु नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सदर रक्तदान शिबिरामध्ये सोशल डिस्टनसिंग राखून 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी कुर्डु गावच्या सरपंच जिजाबाई भोसले, उपसरपंच शिवाजी कापरे,माजी उपसरपंच संदीप पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त कुर्डु ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages