राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या गेली 400 पार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2020

राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या गेली 400 पार


राज्यात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले,कोरोनाबाधितांची संख्या गेली 400 पार 

मुंबई : महाराष्ट्रातील 'कोरोना'ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना 'कोरोना'मुळे प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान, बुलडाण्यातही आणखी एकाचा 'कोरोना' रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 वर गेली आहे. त्यातील एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. काल दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तिघांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages