पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 18, 2020

पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण
                 विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
                       

         पुणे दि.18:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            विभागात 646 बाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर  जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.
            आजपर्यत  विभागामध्ये एकूण  8 हजार 188 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 588 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 646  चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.
            आजपर्यंत विभागामधील 39 लाख 33 हजार 496 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 47 लाख 82 हजार 812  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 811 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages