प्रधानमंत्री अन्न योजनेतून दोन दिवसात 4737 क्विंटल तांदळाचे मोफत वितरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 12, 2020

प्रधानमंत्री अन्न योजनेतून दोन दिवसात 4737 क्विंटल तांदळाचे मोफत वितरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

प्रधानमंत्री अन्न योजनेतून दोन दिवसात
4737 क्विंटल तांदळाचे मोफत वितरण
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

          सोलापूर दि. 11 : संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या गरीब कुटुबांना  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून 4737 क्विंटल तांदळाचे दोन दिवसात मोफत वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.
            संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या गरीब कुटुबांना मदत होण्यासाठी केंद्र सरकारने मोफत तांदळाचे वितरण करण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करुन तांदुळ उपलब्ध करुन घेतला व त्याचे वितरण करण्यास काल सुरुवात केली.  दोन दिवसात 4737 क्विंटल  तांदळाचे वितरण करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
            दरम्यान एप्रिल महिन्यातील अंत्योदय अन्न योजनेतून 18612 क्विंटल गहू आणि तांदूळ वितरण करण्यात आला आहे.  प्राधान्य कुटुंब योजनेतून 95283 क्विंटल गहू तांदुळ आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे. मे आणि जून महिन्याकरीता वरील दोन  योजनेतून गहू आणि तांदळाच्या वितरणासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय खाद्य महामंडळाकडे पैसे भरले असून त्याची उचल 15 एप्रिल पासून सुरू करण्यात येईल. मे आणि जून महिन्यातही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मोफत तांदळाचे वितरण केले जाणार आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
            केशरी  शिधा पत्रिका धारकांना  (एपीएल) मे आणि जून महिन्याकरीता प्रति सदस्य प्रति माह पाच किलो धान्य दिले जाणार आहे. यामध्ये  8 रुपये दराने 3  किलो गहू  आणि 12 रुपये दराने 2 किलो तांदुळ दिला जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ठ न झालेले शहरी भागातील कमाल 59 हजार ते 1 लाख रुपये आणि ग्रामीण भागातील कमाल 44 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारे कुटुंब यास पात्र ठरतील. 
केशरी शिधापत्रिका (एपीएल) धारकांसाठी आवश्यक धान्य
कार्ड संख्या
375152
लाभार्थी संख्या
879363
आवश्यक गहू 3 किला प्रति लाभार्थी
26380.89 क्विंटल
आवश्यक तांदूळ 2 किला प्रति लाभार्थी
17587.26 क्विंटल
आवश्यक निधी गहू प्रति क्विंटल 2683.84 प्रमाणे
7,08,02,088/-
आवश्यक निधी तांदूळ प्रति क्विंटल 3726.76 प्रमाणे
6,55,43,497/-
एकूण आवश्यक निधी
13,63,45,585/-

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages