कृषी उत्पन्न बाजार समितीने सतरा गावातील 450 कुटुंबांना केले जीवनावश्यक धान्याचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 11, 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीने सतरा गावातील 450 कुटुंबांना केले जीवनावश्यक धान्याचे वाटप

कृषी उत्पन्न बाजार समितीने सतरा गावातील 450 कुटुंबांना केले जीवनावश्यक धान्याचे वाटप.

गरजूंना केलेल्या मदतीतून आम्हांला समाधान लाभले---गिरीश गंगथडे

 
 
सांगोला (जगन्नाथ साठे)  गरजूंना केलेल्या मदतीतून आम्हांला समाधान लाभले असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, प्रशासनाच्या सूचनेनुसार सहकार्याची आणि कर्तव्याची भावना समजून तालुक्यातील सतरा गावातील ज्यांचे हातावरचे पोट आहे,आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या जवळपास 450 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट दिल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीष गंगथडे यांनी दिली. 
    एखतपुर ता- सांगोला  येथे गावातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तू वाटप करतेवेळी सभापती गिरीष गंगथडे,पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,बाजार समिती संचालक तानाजी काका पाटील,संजय गणपत इंगोले,सचिव के.एम.पडवळकर,सरपंच चांदणी फाळके,उपसरपंच दत्तू चव्हाण,तलाठी हरिशचंद्र जाधव,ग्रामसेवक शंकर मेटकरी,पोलीस पाटील सतपाल चव्हाण,संतोष तात्या नवले,आदि मान्यवर उपस्थित होते.
    या वेळी गावातील एकवीस गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.  कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व दृष्टीने  प्रयत्न करीत आहे.गाव पातळीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स ठेवून लोकांना जीवनावश्यक किट देण्यात आले.  या जीवनावश्यक वस्तू किटमध्ये दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो साखर,एक किलो तेल, एक साबण, एक किलो तूर डाळ,इ वस्तुंचे किट बनविले होते.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे महेंद्र वाघमारे,संजय माने,बाळासाहेब नरुटे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages