मुख्यमंत्री सहाय्यता निधीस श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने 25 हजार रुपये मदत निधी प्रदान
मंगळवेढा -- जगावर covid-19 कोरोना रोगाच्या साथीमुळे आपत्ती ओढावलेली असताना भारत देश व महाराष्ट्र राज्य यातून सुटलेला नाही. संपूर्ण मानव जातीवर आपत्ती ओढावली आहे. म्हणून या राष्ट्रीय आपत्ती मध्ये मा. मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार आपत्कालीन व्यवस्थापनासाठी श्री.संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 हजार रुपयाची मदत निधी देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार संचारबंदी असल्याने सर्व संचालक मंडळाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आज संस्थेचे माजी चेअरमन अशोकराव मलगोंडे, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर, मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे चिटणीस मोहनराव लेंडवे यांनी तहसिलदार मा. स्वप्नील रावडे साहेब याच्यांकडे 25 हजार रुपये धनादेश सुपूर्द केला.
यावेळी हा मदतनिधी देवून राष्ट्रीय आपत्तीमध्ये मदतनिधी देण्याचा योग्य निर्णय घेतल्याबद्दल मा. तहसिलदार यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment