दिपकआबा प्राथ. शिक्षक पतसंस्था व शिक्षक संघाचे वतीने गरजूंना मोठी मदत
सांगोला/प्रतिनिधी - कोरोना हाहाकारामुळे असलेल्या लॉक डाऊनमुळे गोरगरीब मजूर यांचे पोटाचे हाल
होत आहेत. त्यामुळे मा दिपकआया साळुखे-पाटील यांचे प्रेरणेने दिपक आबा साळुखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्था सांगोला व सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने तालुक्यातील सुमारे १६० गरजू कुटूंबांना मोलाची असणान्या जिवनावश्यक वस्तुची मदत करण्यात आली. ६५० रू किंमतीच्या या किटमध्ये १० किलो गहु, ५ किलो तांदुळ, साखर, गोडेतेल, तुरदाळ प्रत्येकी १ किलो अशा वस्तू असून १६० किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील जवळे, सोनंद, निजामपूर, कडलास, आलेगांव, मेडशिंगी, महुद, संगेवाडी, सांगोला, एखतपूर, वाकी (घे), जुनोनी, पाचेगांव, चिंचोली या गावांमध्ये पतसंस्था व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत गरजू कुटूंबांना किटचे वाटप केले. सुमारे १ लाख ५ हजार रूपये किंमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील सुमारे ९० प्राथमिक शिक्षकांनी ११० किटची देणगी संघटनेकडे जमा केली तसेच पतसंस्थेच्यावतीने ५० किट असे १६० किटचे वाटप केले.
याकामी गुलाबराव पाटील, सुहास कुलकर्णी, संजय काशीद-पाटील, केशवराव घोडके, विकास साळुखे, विलास डोंगरे, कैलास मडके, विश्वंभर लवटे, संतोषकुमार निंबाळकर, वसंत बंडगर, धुळा व्हनमाने, रफिक शेख, तानाजी खबाले, रफिक मुलाणी, मोहन अवताडे, बाबासाहेब इंगोले सह
संघटना व पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. असे पतसंस्थेचे चेअरमन महादेव सुरवसे व सचिव अमर कुलकर्णी यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment