पेनूर परिसरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरा-घरांत साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2020

पेनूर परिसरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरा-घरांत साजरी

पेनूर परिसरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरा-घरांत  साजरी

भीमजयंती : डॉक्टर,पोलीसांना सहकार्य करुन घरीच थांबण्याचा दिला संदेश

पेनूर : प्रतिनिधी देशामध्ये कोरोना संसर्गजन्य विषाणुने धुमाकुळ घातल्याने देश लॉकडाऊन करत संचाबंदी केली आहे.कोणतेही सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी नाही.याचेच भान ठेवत व प्रशासनाच्या आवाहनास साथ देत पेनूर (ता.मोहोळ) येथील परिसरातील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत,सामाजिक संदेश देत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ जयंती घराघरामध्ये साजरी केली आहे.
पेनूर येथील बाबासाहेब आवारे,शिवाजी आवारे,राजेंद्र आवारे या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरामध्ये साजरी करुन डॉ.आंबेडकर यांनी मिळविलेल्या पदव्या,त्यांचा जीवनप्रवास तसेच शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा,डॉक्टर,पोलीसांना सहकार्य करु,घरीच थांबुया कोरोनाला हरवुया अशा सामाजिक संदेशाचे फलक लावुन जनजागृती करत प्रतिमांसमोर आकर्षक सजावट केली आहे.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन,त्रिसरण पंचशील,संविधान वाचन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सौरभ आवारे,भैय्या आवारे,निलरत्न आवारे,गौरव आवारे,प्रणव आवारे,कमल आवारे,मीना आवारे,तक्षशिला आवारे,प्राजक्ता आवारे,प्रगती आवारे,नालंदा आवारे,दिक्षा आवारे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages