सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला ; जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री
सोलापूर- सोलापूर जिल्हयाच्या पालकमंत्री पदी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
सध्या सोलापूर जिल्ह्याचा पदभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे. देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. या
बिकट परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री नसल्याची ओरड केली जात होती.
पालकमंत्री सोलापूरात उपस्थित नसतना जिल्हा प्रशासनाने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे. अशा
आव्हानात्मक आणि युध्दजन्य परिस्थितीत डॉ. आव्हाड यांचा सारखा कार्यक्षम पालकमंत्री मिळाल्याने सोलापूरला
नक्कीच फायदा होणार आहे.
सोमवार पासून सोलापूरात.
ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सोमवार पासून सोलापूरात
मुक्कामी असणार असल्याची माहिती दिली.
0 Comments