Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना पासून बचावासाठी अकलूज ग्रामपंचायतीचा पॅटर्न प्रभावी प्रशासन व राजकीय पदाधिकार्‍यांचेही मोलाचे योगदान

कोरोना पासून बचावासाठी अकलूज ग्रामपंचायतीचा पॅटर्न प्रभावी
प्रशासन व राजकीय पदाधिकार्‍यांचेही मोलाचे योगदान

अकलूज : जगभरात शिरकाव केलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणू मुळे सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे हा टाळण्यासाठी विलगीकरण अर्थात एकमेकांपासून सुरक्षीत अंतर ठेवणे हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहिर केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकलूज ग्रामपंचायतीनेही कोरोना टाळण्यासाठी प्रभावी उपययोजना राबविल्या असून नागरीकांकडून याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
              माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, स.म.कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवामृतचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील व पं.स.चे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. यामध्ये अगदी सुरूवातीला कोरोना विषाणू  त्यापासून आजार, त्याची लक्षणे व तो आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची या संदर्भात माहिती पत्रक तयार करून ते गावातील पत्येक नागरीकांच्या घरोघरी जावून वाटप करण्यात आले. शिवाय गावातील प्रत्येक चौकात बसविलेल्या स्पीकर च्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनीटायझरही वाटप करण्यात आले.                   जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर गावातील आठवडा बाजार बंद ठेऊन नागरीकांना गर्दी टाळण्यासाठीच्या सूचना देण्याबरोबरच नागरीकांची खान्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भरणारी मंडईची जागा बदलून पटांगण असलेल्या ठिकाणी हलविण्यात आली. येथेही गर्दी होऊ नये म्हणून एक-एक मिटरचे ब्लॉक आखून सुरक्षीत अंतर ठेऊनच नागरीकांनी फळे-भाजीपाला खरेदी करण्याची विनंती करण्यात येत आहे. शिवाय ग्राहकांना सॅनिटायझर व हात धुण्यासाठी पाण्याची सोयही ग्रामपंचायतीच्या वतीने करून देण्यात आली आहे. हाच नियम किराणा व मेडीकल दुकानांनाही लावून येथे येणार्‍या ग्राहकांनीही एक मिटरचे अंतर ठेऊनच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले. 
                   सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही नगरपालिका, महानगरपालिकेच्या अगोदर अकलूज ग्रामपंचायतीने ब्लोअर मशिनच्या सहाय्याने संपूर्ण अकलूज परिसरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, गल्ली-बोळामध्ये औषध फवारणी करून इतरांसाठी एक आदर्श निर्माण करून दिला आहे. नागरीकांच्या व व्यापार्‍यांच्या आग्रहाखातर सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी पोलिस व प्रशासना बरोबर चर्चा करून जिवनावश्यक मालाच्या घरपोच सुविधा देण्याचा उपक्रम चालू केला आहे. यामध्ये किराणा, फळे, पालेभाज्या, दूध, चिकन, मटन, अंडी, पाण्याचे जार विक्री करणार्‍या अर्थात घरपोच सुविधा देणार्‍या व्यापार्‍यांचे नाव आणि फोन नंबर ची नोंद सध्या सोशल मिडीयात प्रसारीत करून नागरीकांना जिवनावश्यक वस्तुंची कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. 
सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील व अकलूज ग्रामपंचायत कोरानापासून बचावासाठी राबवित असलेल्या विविध उपाययोजना बांबत परिसरातील नागरीकांतून समाधान व्यक्क्त होत असून आभार व्यक्क्त केले जात आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments