Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक - धैर्यशील मोहिते पाटी; विक्रेते व ग्राहक यांना सोशल डिस्‍टन्सिंग ठेवण्‍याचे आवाहन

सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक - धैर्यशील मोहिते पाटी; विक्रेते व ग्राहक यांना सोशल डिस्‍टन्सिंग ठेवण्‍याचे आवाहन


अकलुज दि २४ - सर्वसामान्यांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने प्रशासन यंत्रणांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सोशल डिस्टन्सचे महत्त्व जाणून याचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक असल्याचे मत शिवामृत दूध संघाचे चेअरमन तथा शिवरत्न शिक्षण संस्थेचे धैर्यर्शील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. 
                 सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय तर जागतिक आरोग्य संघटना अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सध्या कुठल्याही व्यक्तीपासून एक मीटर किंवा तीन फूट अंतरावर असणे सुरक्षित आहे.
                   जीवनावश्यक वस्तू ,किराणा मालाच्या दुकानांमध्ये ,मेडीकल स्टोअर तसेच भाजीपाला खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येनं त्यामुळे गर्दी होत आहे. यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे अवश्यक आहे. 
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक नियमानुसार एक मीटर किंवा तीन फुट अंतरावर दुकानांच्या बाहेर ग्राहकांना  उभारण्यासाठी चौकट किंवा सीमारेषा आखून घ्या. भाजीपाला विक्रेते मेडिकल स्टोअर, किराणा दुकाने यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच ग्राहकांनी या निर्देशांचे पालन करावे. जेणे करून दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवता येईल. लोक जितके एकमेकांपासून दूर असतील, तितकाच या विषाणूचा फैलाव कमी होत जाईल हे प्रामुख्याने लक्षात ठेवले पाहिजे.
                 कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जातेय, त्यामुळे सरकार करत असलेले निर्देश पाळावेत. सामान्यांनी कुठेही जमाव, घोळक्यांनी राहू नये. शिवाय, कोरोनाची भीती न बाळगता आपापल्या घरी सुरक्षित रहावे. एकमेकांपासून अंतर राखावे. या काळात सर्वांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्याचे आव्हान आहे. यात सर्वसामान्यांनी सहकार्य करुन सोशल डिस्टन्स राखुन आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील  त्यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments