अकलूजमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी
अकलूज ( प्रतिनिधी ) माळशिरस पंचायत समितीच्या सूचनेनुसार अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर अकलूजच्या प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
कोरोना सारख्या महाभयंकर प्राणघातक विषाणूने जगभरात तांडव घातला आहे. या विषाणूने कित्येकांना विळख्यात घेऊन अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे. या विषाणूचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी अखंड देशातून शर्तीचे प्रयत्न चालू असून शासन प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. अकलूज ग्रामपंचायतीने विशेष खबरदारी घेत अकलूज मधील सर्व रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक ठिकाणी, घरगुती कट्टे, आदी ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असेही आवाहन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
0 Comments