लऊळमधील एटीएम मध्ये खडखडाट,नागरिकांचे पैशाअभावी हाल
लऊळ:(कालीदास जानराव) - देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू आहे.सध्या वेळेच्या बंधनात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.यासाठी नागरिक कॅशलेस पद्धतीने व्यवहार करत आहेत.परंतु काही व्यवहार कॅशलेस पद्धतीने होऊ शकत नसल्याने लोक एटीएम व बँकांकडे धाव घेत आहेत.परंतु लऊळ ता.माढा येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये सध्या खडखडाट झाला आहे.गावामध्ये एकच एटीएम मशीन असल्याने नारगरिकांची चांगलीच ताराबळ उडाल्याचे दिसून येते आहे.
0 Comments