राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2020

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
        वर्षा निवासस्थानी कोरोना उपयाययोजनांसंदर्भात आज मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना आरोग्याची काळजी घेऊन जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
          संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळायच्या आहेत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages