Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी स्वतःच्या घरीच थांबून खेळा मनोरंजनात्मक खेळ;जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे आवाहन

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी स्वतःच्या घरीच थांबून खेळा मनोरंजनात्मक खेळ;जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे आवाहन


माढा /प्रतिनिधी (राजेंद्र गुंड) - सध्या देशात व राज्यात भयंकर अश्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून सातत्याने या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या वतीने 14 एप्रिल 2020 पर्यंत पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला योग्य प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरीच मनोरंजनात्मक खेळ खेळत बाहेर अनावश्यक गर्दी न करता कोरोना विषाणूंचा मुकाबला करावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी केले आहे.

सध्याची कोरोना विषाणूंच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा अधिक संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकारने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी विनाकारण व अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडून गर्दी करू नये याकरिता जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी प्रत्येकाने आपापल्या घरीच बसून कॅरम,पत्ते, बुद्धिबळ,चांगली पुस्तके व कादंबऱ्या वाचणे,चित्रे काढणे, लेखन करणे, टीव्हीवर बातम्या पाहणे, विनोद व मनोरंजनात्मक गोष्टी सांगणे, मुलांसमवेत खेळणे, जुने गाजलेले मराठी व हिंदी चित्रपट पाहणे,टीव्ही वरील धार्मिक व ऐतिहासिक आणि प्रबोधनपर मालिका पाहणे अशा गोष्टीतून आपला वेळ सत्कारणी लावणे गरजेचे आहे.त्यामुळे आपला दररोजचा दिवस व्यवस्थित व्यतीत होऊ शकतो.

घरी बसून थकवा,कंटाळा किंवा आळस येवून बोअर होणार नाही म्हणून कुटुंबप्रमुखाने सुद्धा अशा पद्धतीचे नियोजन करणे गरजेचे आहे.प्रत्येकाने शासनाने व आरोग्य विभागाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर व तंतोतंतपणे पालन करून या राष्ट्रीय आपत्तीचा आणि महामारीचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.सध्या जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे हे स्वतः आपल्या मातोश्री कृषीभूषण सुनंदाताई शिंदे,सुविद्य पत्नी प्रणिता शिंदे,मुलगी आर्या व मुलगा कृष्णा यांच्यासमवेत घरातच पत्ते खेळून घरी थांबण्यासाठी इतरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments