Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात जंतूनाशक फवारणी सुरु...

 सोलापूर शहरात जंतूनाश फवारणी सुरु...




सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोनो संसर्गजन्य रोग वाढू नये या संदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील भाजी मार्केट, पेट्रोल पंप तसेच गर्दीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड रसायनयुक्त पाण्याची  फवारणी अग्निशमक दलाच्या साहयाने आज नवी पेठ येथून सुरवात करण्यात आले. त्यानंतर कस्तुरबा मार्केट,लक्ष्मी मार्केट, सत्तर फूट रोड येथील भाजी मार्केट आदी ठिकाणी फवारणी करण्यात येणार आहे.सोलापूर शहरातील कोरणा रोखण्याकरिता शहर परिसरामध्ये जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी सोडियम  हायपोक्लोराईड रसायनयुक्त पाण्याची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.तसेच कोरोना संसर्गजन्य रोग वाढत असून त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तरी नागरीकांनी वेळोवेळी खोकताना तोंडाला रुमाल अथवा टिश्यू पेपर चा वापर करावा तसेच दिवसातून 20 वेळा हात धुवावे, आणि समोरच्या व्यक्तींशी बोलताना अंतर बाळगावे तसेच ताप, सर्दी, खोकला असल्यास त्वरीत डॉक्टरकडे दाखवावे गरज असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घरीच थांबावे. असे आवाहन मा.महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.यावेळी आरोग्य अधिकारी संतोष नवले,अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे,सिद्धेश्वर बोरगे तसेच आरोग्य व अग्निशमक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments